गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१०

कळ ....

तो दिवस लख्ख आठवतो .रात्री दोन वाजल्या पासूनच बाळाची पोटात वळवळ सुरु झाली होती. शरीराबरोबर मनाचीही घालमेल होत होती.दिवस भरलेले होते,त्यामुळ केंव्हाही प्रसूती शक्य होती.पण तरी सकाळ होई पर्यंत घरीच वेळ काढला .आणि सकाळी ११ वाजता दवाखान्याकडे मोर्चा वळला .पेन असूनही डॉक्टरांना प्रसूतीची चिन्ह दिसत नव्हती.म्हणून नुसत दाखल करून घेत ,त्यांनी वाट पाहायला सांगितलं.शेजारचा रूम मध्ये साधारण माझाच वयाची आणि पहिलीच वेळ असणारी एक मुलगी होती.तिला माझापेक्षा खूपच जोरात पेन होत होत्या . तिचे दिवस भरायला अजून चार दिवस अवकाश होता.पण तरीही तिला खूप पेन येत होत्या .त्यामुळ माझी अस्वस्थता अधिकच वाढली होती.(कारण मला आत्ता पर्यंत जाणकारांकडून सांगण्यात आल होत की प्रसुतीचा वेळेला जितक्या जास्त पेन असतील ,तितक चांगलं असत.)
    माझा पेन तुलनेन कमी वाटत होत्या .त्यामुळ सीझर कराव लागेल का ,बाळ सुदृढ असेल ना अशा असंख्य प्रश्नांनी माझ मन भरून गेल होत.तिकडे शेजारचा पेशंट ला पेनकिलर देण्यात येत होत्या.तीच विव्हळण ही अखंड सुरूच होत,आणि माझा मनाची धाकधूक ही .तिचा असंख्य  गोतावळा तिचा भोवती गोळा झाला होता.मला वेळ जात नव्हता .व्हरांड्यात फेऱ्या मारून झाल्या.खावून ,पिऊन झाल,गप्पा झाल्या .अस दुपार पर्यंत सुरु होत.दुपारी तिची प्रसूतीची वेळ जवळ आली असेल म्हणून तिचा पेनकिलर चा आणखी एक डोस ही झाला.पण मी आपली तीच निरीक्षण आणि स्वतःचा काळजीन ग्रासले होते.एवढ्यात तिची आजेसासू माझा खोलीत आली.माझी सगळी चौकशी करून झाल्यावर शेजारचा खोलीत ली मुलगी तिची नात आणि सूनही असल्याच तीन सांगितलं .आणि नंतर म्हणाली ,"काही नाही होत वो तिला ,नुसती नाटक आहेत ही,यांना जरा सहन करायला नको,आज कुठली होते तिची प्रसूती ? "..तीच हे बोलणं ऐकल्यावर मला त्या बाईची एकदम गम्मत च वाटली.आणि तिला जराही दया माया नसल्यासारखं जाणवल.
  या आजींशी बोलताबोलताच माझा कळ एकदम वाढल्या होत्या .म्हणून मला पेनकिलर द्यायला डॉक्टर आले,तोच माझी वेळ जवळ आल्याच नर्से चा लक्षात आल.तिनी मला operation  थेटर ला हलवलं.पुढचा दोन तासात प्रचंड धावपळ आणि गडबड ...सगळ कल्पनेचा पलीकडच,असंख्य वेदना दायी तरीही सुखावह ..या भावनांचा  कल्लोळात साडे आठचा सुमारास माझ बाळ माझा कुशीत आल.
  नऊ वाजण्याचा सुमारास सगळ आवरून झाल्यावर परत मला माझा रूम मध्ये हलवण्यात आल.तर शेजारचा रूम मध्ये गर्दी भरली होती.माझ मन पुन्हा हजार शंकांनी भरून गेल.तोच पलीकडून ओरड्ल्याचे आवाज आले.मी न राहवून नर्से ला विचारल ,तर ती नि सांगितलं,"काही नाही तिचा लग्नाचा वाढदिवस आहे.म्हणून केक कापत आहेत."हे ऐकल्यावर मन निश्चिंत झाल पण पुन्हा प्रश्न पडला.आणि तिला कळ येत होत्या त्याच काय ?हे नर्स ला विचारणार त्या आधी तिनंच सांगितलं,"तिला लग्नाचा वाढदिवसालाच मुल हव होत ,म्हणून नाटक करत होती ती,डॉक्टरनी सीझर कराव म्हणून ... "इति...